top of page

आवर्ती  ठेव

संस्थेच्या सभासदांची बचत वाढावी म्हणून संस्थेने आवर्ती ठेव योजना माहे डिसेंबर २0१९ पासून चालू केलेली आहे. तरी सभासदांनी या योजनेमध्ये जास्तीत जास्त रक्‍कम गुंतवणूक करून या योजनेचा फायदा घ्यावा ही विनंती.

आवर्ती ठेवयोजनेचे नियम व अटी -

संस्थेच्या सर्व सभासदांना स्वत:चे नावाने संस्थेमध्ये आवर्ती ठेव या योजनेमध्ये एकच खाते उघडला येईल व त्यात दरमहा ठराविक रक्‍कम ठेवता येईल. त्याचे नियम खालीलप्रमाणे असतील.

  • या योजनेमध्ये दरमहा रू. १०००/- चे पटीत रक्कम ठेवता येईल.

  • ही योजना ५ वर्षाचे कालावधीसाठी असेल.

  • दरमहा हप्ता महिन्यातून एकदा कोणत्याही तारखेस भरता येईल.

  • वेळेवर हप्ते न भरल्यास खाते बंद करण्याचा अधिकार संस्थेचा राहील.

  • आवर्ती ठेव योजनेची मुदत संपल्यानंतर खात्यावर पुढील कालावधीचे व्याज मिळणार नाही.

  • खातेदार मयत झाल्यास कायदेशीर वारसास व्याजासह रक्‍कम दिली जाईल.

  • ठरलेल्या मुदतीच्या आत खाते बंद केल्यास खालीलप्रमाणे व्याज दिलेजाईल.

       अ) ६ महिनेच्या आत खाते बंद केल्यास व्याज मिळणार नाही.
       ब) ६ महिनेच्या पुढे खाते बंद केल्यास ठरलेल्या व्याजापेक्षा १ % कमी व्याज मिळेल.

  • मासिक ठेव योजनेचा व्याजाचा दर कार्यकारी मंडळ वेळोवेळी निश्‍चित करेल.

  • वरील नियम बदलण्याचा, वाढविण्याचा अगर दुरूस्त करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहील.

 
   -: पाच वर्षानंतर अदा करणेत येणाऱ्या रकमेचा तक्ता  :-

image.png

कर्ज मागणी अर्ज 

bottom of page